

जिंतूर - तालुक्यातील लिंबाळा, चिंचोली-गुट्टे ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी (ता.०५) सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान प्रक्रिया पार. यात ९२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सरपंच थेट जनतेतून,व नवू सदस्य निवडून देण्यासाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान घेण्यात आले.यावेळी १२६६ पैकी, ११६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.ज्याची
टक्केवारी ९१.९४ टक्के आहे. तहसीलदार तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी राजेश सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळेतील तीन बुथवर मतदान घेण्यात आले
निवडणुकीत गावातील लोकशाही विकास आणि जगदंबा विकास या दोन पॅनलमध्ये सरळ सरळ लढत असून सरपंचपदासाठी दोन तर सदस्यपदासाठी अठरा उमेदवार मैदानात उतरले.उद्या) ता. ०६) तहसील कार्यालयात सकाळी १० च्या सुमारास मतमोजणी होऊन निकाल घोषीत होणार आहे.
निवडणूक शांततेत खेळीमेळीने पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षकअनिरुद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय खोले, पिएसआय इनोले,बिट जमादार गुगंणे,पो.का.मुरकुटे,पो का. राठोड, परभणी गोपनीय शाखेचे पोलिस हवालदार जिया खान पठाण, जिंतूर पोलिस गोपनीय शाखेचे धोत्रे,आदींनी चोख बंदोबस्त ठेवले होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.