जळकोटमध्ये 29 हजार 34 मतदार बजवणार मतदानाचा हक्क; माहीत करून घ्या कशी असेल प्रशासन यंत्रणा

शिवशंकर काळे
Wednesday, 13 January 2021

तालुक्यात 29 हजार 34 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी तालुका प्रशासनाच्या गतीने मतदानांची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे

जळकोट (लातूर): तालुक्यात 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यापैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे. आता उर्वरित 26 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी ( ता.15) रोजी मतदान होणार आहे. तालुक्यात 29 हजार 34 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी तालुका प्रशासनाच्या गतीने मतदानांची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे. तहसील कार्यालयात 9 टेबल वर 9 फेरीत मतमोजणी होणार आहे.

यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे उमेदवारसह पाच व्यक्तींनाच प्रचाराची परवानगी असल्यामुळे पॅनल प्रमुखासह उमेदवारांनाही प्रचारासाठी मर्यादा येत आहेत. काही ठिकाणी नियमाचे उल्लघंन होताना दिसून येत आसले तरी त्यातून मार्ग काढत प्रचार सुरु आहे. निवडणूक प्रचारात आजी, माजी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,पक्षाचे पदाधिकारी, निवडणुकीवर लक्ष ठेऊन आहेत.

Bird Flu: लातूररोड येथे 6 कावळ्यांचा मृत्यू; गावकऱ्यांत भीती

ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, शंभर ई.व्ही.मशिन, 55 खाजगी वाहन, 427 कर्मचारी, दहा झोन अधिकारी, 76 बुथ आहेत. मतदानासाठी आलेल्या मतदारांना मास्क लावणे बंधनकारक आहे. ओळख पटण्यासाठी काही वेळापुरता मास्क काढावा लागणार आहे.तसेच मदतानावेळेस कोरोनाचा धोका होऊ नये यासाठी प्रतेक केंद्रावर सॅनिटाझर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

तसेच मतदारांचे तापमान मोजले जाणार आहे. तालुका प्रशासनातर्फे निवडणुकीची जवळपास तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्राची  स्थापना करण्यासोबतच मतदान यंत्र सिल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.मतदान केंद्रावर संबधित अधिकारी कर्मचाऱ्यांसह सुरक्षा व्यवस्थेसह कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत.

तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असून तिरुका ता.जळकोट ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे. त्यामुळे 26 ग्रामपंचायतीच्या 203 जागेसाठी मतदान होणार आहे. एकुण 29 हजार 34 मतदान असून यात पुरुष 16 हजार 951 स्ञी 15 हजार 43 आहेत. तहसिलच्या निवडणुक विभागाकडून दहा झोन अधिकारी, 55 वाहन,427 कर्मचारी, 76 बुथ,शंभर ई.व्ही.मशिनचे नियोजन करण्यात आले आहे.ता.पंधरा रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यत मतदान होणार आहे. 18 रोजी जळकोट तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून मतमोजणीसाठी 9 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.नऊ फेरीत मतमोजणी संपन्न होऊन निकाल जाहीर होणार आहे.
 

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election jalkot political news latur