
निलंगा (लातूर): ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यापेक्षा खर्च दाखल करण्याची प्रक्रिया अधिकच किचकट असल्याचा अनुभव विजयी व पराभूत अशा दोन्ही उमेदवारांना येत आहे. खर्च दाखल केलेल्या उमेदवारांना वेगवेगळ्या नमुण्यात निवडणूक विभागाकडे निवडणुक खर्च दाखल करावा लागत असल्यामुळे उमेदवारांची दमछाक होत आहे.
तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून या ग्रामपंचायतीमधील ४२८ जागेसाठी ९२३ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. यामध्ये अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला आहे.
तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील नणंद, माळेगाव (जे), कोकळगाव, उस्तुरी, वाक्सा, माळेगाव (क), टाकळी, पिरुपटेलवाडी, केळगाव, हाडगा, ताजपुर, गौर, सावरी, बसपुर, हंद्राळ, वळसांगवी, होसुर, शिरोळ, नदीवाडी, हंचनाळ, तगरखेडा, डांगेवाडी, अंबुलगा (मेन), आनंदवाडी (गौर), शिऊर, आनंदवाडी (अं.बु), डोंगरगाव (हा), कासारशिरसी, रामतीर्थ, सिंगनाळ, गुऱ्हाळ, लांबोटा, ताडमुगळी, सरवडी, बडुर, औराद शहाजनी, जाजनूर, मुदगड (ए), ढोबळेवाडी /माचरटवाडी, खडकउमरगा, वाडीशेडोळ, हासोरी (बु), वांजरवाडा, बामणी, कासार बालकुंदा, कोराळी, अंबेगाव, सांगवी (जे), हणमंतवाडी या गावच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत.
यातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून त्यांनी निवडणूक संपेपर्यंत जो खर्च केला याचा दैनंदिन हिशोब निवडणूक विभागाकडे देणे अनिवार्य आहे. ज्या उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च दाखल केला नाही अशा उमेदवारांना तहसीलदारांनी खर्च दाखल करण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत.
प्रत्येकाला बँकेमध्ये खाते काढणे व त्यातूनच खर्च करणे बंधनकारक असल्यामुळे व बॅनर, पोलचिट, पोस्टर, ऑनलाईन अर्ज भरणे, बाँडवरती शपथपत्र आदी किचकट हिशोब विविध फॉरमॅटमध्ये द्यावा लागत असल्यामुळे निवडणूक लढवण्यापेक्षा खर्च दाखल करण्याची प्रक्रिया अधिक किचकट असल्याचा प्रत्यय उमेदवारांना येत आहे.
हिशोबाची जुळवाजूळव करताना त्यांची दमछाक होत आहे. शिवाय विविध बाबी खर्चिक असल्यामुळे निवडणूक न लढवलेले बरे अशी प्रचिती विजयी उमेदवारांबरोबर पराभूत झालेल्या उमेदवारांना येत आहे. पराभूत उमेदवारांनाही खर्च दाखल करणे अनिवार्य असल्यामुळे पराभवा बरोबर हातात कागदे घेऊन हिशेबाची जुळवाजूळव करावी लागत आहे.
(edited by- pramod sarawale)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.