Gram Panchayat Election: पहिल्याच दिवशी 14 उमेदवारांची माघार; आता प्रतिक्षाची सोमवारची

युवराज धोतरे 
Friday, 1 January 2021

निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने नेमक्या लढती कोणत्या गावात कशा होतील हे मतदारांना समजणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता सोमवार या दिवसाकडे लागले आहे.

उदगीर (लातूर) : तालुक्‍यात सुरू असलेल्या एकसष्ठ गावच्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (ता.१) आठ गावच्या चौदा जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिले आहे.

या निवडणुकीत सहभागी असलेल्या वाढवणा बु (९०), आडोळवाडी (१२}, अरसनाळ (२१), इस्मालपुर (१३}, एकुरका रोड (२९}, करडखेल (२७}, करवंदी (२७}, कासराळ (२६}, करखेली (१७}, वाढवणा खू (५२},  गुरदाळ (१८},  किनी येल्लादेवी (१८}, जानापूर (२४}, कुमदाळ (हेर) १८, कुमठा (२५}, जकनाळ (८},  टाकळी (७},  कौळखेड (३९}, खेरडा (१६},  गंगापूर (१४},  गुडसुर (२९},  अवलकोंडा (२२}, चिगळी (१४},  लोणी (५०},  कुमदाळ {उदगीर} २०, चांदेगाव (३१}, डांगेवाडी (१०},  डाऊळ (१६},  डोंगरशेळकी {२५), तादलापूर (१४},  दावणगाव (२३}, धडकनाळ (७}, धोंडीहिप्पर्गा (२७},  लिमगाव (१४}, नळगीर (५७},  कोदळी (१२}, निडेबन (६८},  पिंपरी (२५}, सुमठाणा (१९},  बामणी (२२}, हकनकवाडी (२०}, बेलसकरगा (२५), बोरगाव (१७}, भाकसखेडा (२१}, मल्लापुर (२२}, मांजरी (१८}, मादलापुर (३२}, माळेवाडी (२२}, येणकी (३८}, वागदरी (१८},  लोहारा (३६}, क्षेत्रफळ (८}, शिरोळ जा (१८},  शेल्हाळ (२०},  हिप्परगा (१६}, हंगरगा (२७}, हंडरगुळी (५५}, हाळी (३३}, रुद्रवाडी (६},  हेर (७०},  होनीहिप्परगा {२०) अशा एकूण पंधराशे चाळीस उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले होतो. पैकी गुरुवारी (ता.३१) दहा जणांचे अर्ज छाननीत बाद ठरले होते.

हिंगोली जिल्ह्यातील १८ एसआरपी जवानांना विशेष सेवा पदक मंजूर​

शुक्रवारी (ता. १) उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या पहिल्या दिवशी एकुर्गा, कुंमदाळ (हेर), जकनाळ, लोहारा, शेल्हाळ, हंडरगुळी या गावचे प्रत्येकी एक तर वाढवणा खू पाच व  निडेबन येथील तीन जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले असल्याची माहिती नायब तहसीलदार श्री गुट्टे यांनी दिली आहे. 

सोमवारी चित्र स्पष्ट होणार-
उदगीर तालुक्यातील एकसष्ठ गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख सोमवार (ता.४) आहे. या दिवशी कोण कोण आपले उमेदवारी अर्ज परत घेणार? यावरून निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने नेमक्या लढती कोणत्या गावात कशा होतील हे मतदारांना समजणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता सोमवार या दिवसाकडे लागले आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election udgir Fourteen candidates withdraw