
नक्षलग्रस्त भागात पोलिस अधिकारी व अंमलदारांनी दोन वर्षे तर राज्य राखीव पोलिस दलाचे अधिकारी तसेच अंमलदारांनी एक वर्षे समाधानकारक सेवा पूर्ण केली असल्याने त्यांनी खडतर सेवेबद्दल ता. ३० डिसेंबरला विशेष सेवा पदक मंजूर करण्यात आले
हिंगोली : गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात पोलिस अधिकारी व अंमलदारांनी दोन वर्षे तर राज्य राखीव पोलिस दलाचे अधिकारी तसेच अंमलदारांनी एक वर्षे समाधानकारक सेवा पूर्ण केली असल्याने त्यांनी खडतर सेवेबद्दल ता. ३० डिसेंबरला विशेष सेवा पदक मंजूर करण्यात आले. ज्यामध्ये जिल्ह्यातील १८ जवानांचा समावेश आहे.
विशेष सेवा पदक मंजूर केलेल्यांमध्ये राज्य राखीव
पोलिस बल गट क्रमांक येथील खलील शेख , विकास खवले , निलेश शेळके, संतोष ढवळे , अनिल आवटे , गणेश काळे , रमेश तायडे , ज्ञानोबा केंद्रे , अविनाश मदेवकर , गोपीनाथ घुगे , कैलास जोगेवार , सचिन सोनटक्के , सुनील नाईक , अतुल रंबे, सलीम अय्युब शेख , सुमेधबोधी कांबळे , अतुल पंडीत , बालाजी जोरगेवार , सचिन अंभोरे यांचा समावेश आहे.
हेही वाचा - हिंगोली : टोळीने गुन्हे करणाऱ्या अकरा आरोपींना केले हद्दपार- पोलीस अधीक्षक राकेश कलासागर
दरम्यान, हिंगोलीचे राज्य राखीव दल शिस्तीसाठी प्रसिध्द आहे.राज्यासह बाहेर राज्यात देखील निवडणुक काळात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी राखीव दलाच्या कंपनीला बोलावले जाते. याशिवाय नक्षलग्रस्त भागातही हिंगोलीच्या राखीव पोलिस दलातील जवान चोख कर्तव्य बजावतात. दरम्यान, नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला पोलिस महासंचालक कार्यालयाने विशेष सेवा पदकाची घोषणा केली आहे.राखीव दलाचे समादेशक संदिप गिल यांनी जवानाचे स्वागत केले आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे