bribesakal
मराठवाडा
Kej Crime : लाच घेताना ग्रामपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; घरकुलासाठीच्या बेबाकी प्रमाणपत्रासाठी केली लाचेची मागणी
घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणारे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवकाने लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली कारवाई.
केज - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणारे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवकाने लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून शुक्रवारी (ता.१९) दुपारी केकतसारणी येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी केकतसारणी येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
