गेवराई - मुंबईतील मनोज जरांगे यांच्या आंदोलनास यश होताच काल गाव-गावात जल्लोष साजरा केला. तोच बुधवारी एक आठवड्यापासून जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यास गेलेले गेवराईतील गावखेड्यातील मराठा बांधव आज गावाच्या वेशीवर येताच मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यात महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याचे पाहण्यास मिळाले होते.