Vijay Potbhare
sakal
माजलगाव - तालुक्यातील नाकलगाव येथील उसतोड मजूर असलेल्या बाबासाहेब सुंदरराव पोटभरे यांचा मुलगा विजय पोटभरे याने अग्निवीर परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत ‘अग्निवीर जनरल ड्युटी’ या पदाला गवसणी घातली आहे. त्याच्या या यशाचे सर्व स्तरातून जोरदार कौतुक होत असून नाकलगाव परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.