Beed News : ‘चिरीमिरी’ व मुजोरीचा मोह सुटेना; सिव्हीलच्या मावश्यांना बदली होऊनही वॉर्ड सुटेना, सीझर व एमटीपी वॉर्डमध्ये ठाण मांडून

बीड जिल्हा शल्यचिकित्सकांनी २० ऑक्टोबर २०२६ रोजी रुग्णालयातील ५४ मावश्या आणि मामांच्या वॉर्ड अदलाबदलीचे आदेश दिले होते.
beed district hospital

beed district hospital

sakal

Updated on: 

बीड - जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांशी चाललेली मावश्यांची मुजोरी, गैरवर्तन आणि चिरीमिरी घेण्याच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी २० ऑक्टोबर २०२६ रोजी रुग्णालयातील ५४ मावश्या आणि मामांच्या वॉर्ड अदलाबदलीचे आदेश दिले होते. नव्या वॉर्डमध्ये तात्काळ रुजू होण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही, अनेक वर्षांपासून एकाच वॉर्डमध्ये ठाण मांडून आपला दरारा निर्माण केलेल्या काही मावश्यांना बदली होऊन महिना होत आला तरीही आपला जुना वॉर्ड सोडण्याचा मोह सुटत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

Loading content, please wait...