महामानवास रक्तदानातून अभिवादन

file photo
file photo

नांदेड : कोरोनामुळे देशासह राज्यावर मोठे संकट आले आहे. यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. अशावेळी लॉकडाऊनचे महत्व जपन्यासाठी रस्त्यावर गर्दी करून जयंती साजरी न करता रक्तदान करून युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्य अभिवादन करण्याचा निर्णय घेऊन नगरसेवक प्रतिनिधी, ब्लॉक कांग्रेस कमिटीचे शहर सचिव तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सुरेश हटकर यांच्या पुढाकाराने शक्तीनगर येथील नागरिकांनी रक्तदान शिबीर घेवून नवा संदेश दिला आहे.

युवकांचा प्रेरणादायी उपकृम
शक्तीनगर येथील सर्व युवकांसह नागरिकांनी कोरोना कोविड-१९ विषाणूमुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी रक्ताची आवश्यकता लक्षात घेवून मंगळवारी (ता. सात) सकाळी दहा वाजता शक्तिनगर येथील बौध्द विहारात रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते. सामाजीक अंतर व लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून रक्तदात्यांनी रक्तदान केले. आयोजकांनी हा संदेश घेऊन इतर नगरमधील तसेच जिल्ह्यातील भीम जयंती मंडळांनी असा सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. विशेष या भागातील सामाजिक कार्यकर्ते लखन कार्ले यांचा वाढदिवसही गर्दी शिवाय या उपक्रमाच्या दिवसाची साजरा करण्यात आला. यावेळी युवकांनी मोठ्या प्रमाणातत रक्तदान केले. 

शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद
रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदान करण्याचे शासनाकडून आवाहन करण्यात आले होते. आवाहनाला प्रतिसाद देत या भागातीळ नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. तब्बल ९८ रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले. या कार्यक्रमाला नगरसेवक प्रतिनिधी तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे युवा जिल्हाद्यक्ष तथा काँग्रेस ब्लॉक कमिटीचे शहर सचिव सुरेश हटकर, किशोर जोंधळे, जेष्ठ नागरिक सावंत काका आदींचे मार्गदर्शन लाभले.

शिबीर यशस्वी करण्यासाठी युवकांनी केले परिश्रम
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी महेश मँगात्रा, रवी गजभारे, राजु कारले, रवी मोरे, सुंदरसिंघ ठाकूर, सोनूसिंघ ठाकूर, वसंत कांबळे, शुभम शंकपाल, चंद्रमुनी गजभारे, राजू चौदंते, क्षीतिज कुरवाडे, प्रदीप तारु, मोहन लोंढे, सूर्यकांत सोनकांबळे, गणेश ठाकूर, सचिन कांबळे, विकी सूर्यवंशी यांच्यासह सर्व बहुजन मित्र परिवारातील युवकांनी परिश्रम घेतले.

वसुंधरा फर्टीलायझर्सकडून एक लाखाचा निधी 
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेऊन प्रशासनास काही उपयुक्त सूचना केल्या. वसुंधरा फर्टीलायझर्सचे यांनी कडून एक लाखाचा निधीयावेळी दिनेश अग्रवाल यांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनात मदत म्हणून एक लाख एक हजाराचा धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, आमदार बालाजी कल्याणकर, नांदेड जिल्हा सिड्स, फर्टीलायझरर्स व पेस्टीसाइड असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष मधुकर मामडे तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com