हिंगोलीच्या रामलिला मैदानावरील वॉकिंग ट्रॅकवर पालकमंत्र्यांनी केली मॉर्निंग वॉक

राजेश दारव्हेकर
Wednesday, 27 January 2021

येथील रामलिला मैदानावर जिल्हा नियोजन समितीमधून सुमारे अडीच कोटी रुपये खर्चुन सपाटीकरण करण्यात आले

हिंगोली : येथील रामलिला मैदानावर पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी (ता. २६) पहाटे एक तास वॉकिंग ट्रॅकवर वॉकिंग केली. यावेळी त्यांनी कामाबाबत काही निर्देशही दिले आहेत.

येथील रामलिला मैदानावर जिल्हा नियोजन समितीमधून सुमारे अडीच कोटी रुपये खर्चुन सपाटीकरण करण्यात आले. या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक देखील उभारण्यात आला आहे. या मैदानाचे लोकार्पण पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सोमवारी (ता. २५) झाले.

हेही वाचामाहूरच्या रेणुका मंदीर विश्वस्तात व पुजेसाठी महिलांना स्थान द्यावे- तृप्ती देसाई

त्यानंतर मंगळवारी पहाटेच पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड व त्यांचे पती राजू गोडसे यांनी सुमारे एक तास वॉकींग केली. त्यानंतर त्या ठिकाणी आवश्‍यक असलेल्या बाबींची पाहणी करून जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. या ठिकाणी हायमास्ट बसविले जावेत तसेच वृक्षारोपन करून परिसर हिरवागार होईल याची दक्षता घ्यावी. तसेच या ठिकाणी वॉकिंगसाठी येणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षेसाठी पोलिस चौकी उभारावी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सुचनाही त्यांनी संबधितांना दिल्या

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Guardian Minister took a morning walk on the walking track at Ramlila Maidan hingoli news