esakal | Beed : सात दिवसांत सात बळी
sakal

बोलून बातमी शोधा

Beed : सात दिवसांत सात बळी

Beed : सात दिवसांत सात बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : अतिवृष्टीने चार लाख हेक्टरांवरील पिकांचा सुपडासाफ झाला आहे, तर सात लोकांचे बळी गेले असून लहान-मोठी १९५ जनावरे दगावली आहेत. सोळा वर्षांनंतर प्रथमच पावसाचा प्रकोप जिल्ह्याने पाहिला आहे. पावसाने चार लाख हेक्टर क्षेत्रांवरील कपाशी, सोयाबीन, ऊस व इतर खरीप पिके सुपडासाफ केली आहेत. विशेष म्हणजे नदी, ओढ्याकाठची हजारो हेक्टर जमीनही उखडून गेली आहे. फळबागा जागीच झोपल्या आहेत.

पुराच्या पाण्यात व अंगावर भिंत पडून सात दिवसांत सात लोकांचा बळी गेला आहे. दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अतिवृष्टीने जिल्ह्यात १०० शेळ्या - मेंढ्या, ४० वासरे व ५० गाय - बैल व म्हैस अशी १९५ जनावरे दगावली आहेत.

रस्ते, पूल गेले वाहून

अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा केज, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, वडवणी व गेवराई तालुक्याला बसला आहे. या तालुक्यांत शंभराहून अधिक रस्ते व पूल वाहून गेले आहेत. मुख्य रस्त्यांवरील पूलदेखील वाहून गेले आहेत. १०७ घरांची पडझड झाली आहे. गेवराई तालुक्यातील बोरगाव येथे अंगावर भिंत पडून एकाचा मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणे व गोदावरी नदीवरील सर्व उच्चपातळी व मध्यम बंधारे हे पूर्ण क्षमतेने भरलेले असून त्यामधून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

loading image
go to top