गुटखा थुंकणाऱ्यामुळे तरुणाचा गेला जीव

परमेश्वर कोकाटे
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

औरंगाबाद-पैठण रस्त्यावर चितेगावकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कार चालक गुटखा थुंकण्यासाठी कारची गती कमी करुन दरवाजा उघडला. पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलला दरवाजाचा धक्का लागला आणि तिचे संतुलन बिघडल्याने समोरुन येणाऱ्या टीपर खाली आल्याने तरुण जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी (ता.23) दुपारी एकच्या सुमारास चितेगाव (ता.पैठण) येथील पथकर नाक्‍याजवळ घडली.

चितेगाव (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-पैठण रस्त्यावर चितेगावकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कार चालक गुटखा थुंकण्यासाठी कारची गती कमी करुन दरवाजा उघडला. पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलला दरवाजाचा धक्का लागला आणि तिचे संतुलन बिघडल्याने समोरुन येणाऱ्या टीपर खाली आल्याने तरुण जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी (ता.23) दुपारी एकच्या सुमारास चितेगाव (ता.पैठण) येथील पथकर नाक्‍याजवळ घडली.

रोहित सोनवणे (वय 25, रा.चितेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
चितेगावकडून औरंगाबादकडे कार चालली होती. त्यामागे रोहित हा मोटारसायकलवरुन (विना क्रमांक) जात होता. कार चालकाने थुंकण्यासाठी दरवाजा उघडला. दरवाजाचा धक्‍का लागल्याने मोटारसायकलचे संतुलन बिघडले व समोरुन भर धाव येणाऱ्या टिपरखाली येऊन रोहितचा मृत्यू झाला. यामुळे औरंगाबाद-पैठण रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutkh Take Youth Life