
गुटखा, दोन वाहनांसह ७० लाखांचा मुद्देमाल जप्त
उस्मानाबाद - स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यात केलेल्या कारवाईत गुटखा, दोन वाहनांसह ६९ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात गस्तीवर गेले होते.
या दरम्यान, बुधवारी (ता.२२) ते कोंड (ता. उस्मानाबाद) येथे गेले. तेथील महालिंग नागू कोरे यांनी कोंड शिवारातील आपल्या शेतातील गोदामात गुटख्याचा साठा केल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने छापा टाकला असता गोदामासमोर आयशर टेंपो, पिकअप या वाहनांत ५२ लाख ९२ हजारांचा गुटखा आढळला.
पथकाने गुटखा, दोन्ही वाहनांसह ६९ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त करून संशयित महालिंग नागू कोरे यांच्याविरुद्ध ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, हेडकॉन्स्टेबल अमोल निंबाळकर, जावेद काझी, प्रकाश औताडे, विनोद जानराव, धनंजय कवडे आदींनी कारवाई केली.
Web Title: Gutkha Two Vehicles And Rs 70 Lakh Seized
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..