17 लाख पंधरा हजार किंमतीचे गुटख्याचेसाहित्य पकडले; मालकाचा शोध घेण्याचे आव्हान

हॉटेल शौर्यवाडा जवळ पोलिसांनी अशोक लेलैंड कंपनीचा टेम्पो (क्रमांक एम एच १४ ई एम ९६५०) अडवला.
 हॉटेल शौर्यवाडा जवळ पोलिसांनी अशोक लेलैंड कंपनीचा टेम्पो (क्रमांक एम एच १४ ई एम ९६५०) अडवला.
हॉटेल शौर्यवाडा जवळ पोलिसांनी अशोक लेलैंड कंपनीचा टेम्पो (क्रमांक एम एच १४ ई एम ९६५०) अडवला. Sakal

उमरगा, (जि. धाराशिव) :  पानमसाला, गुटखा व त्याचे साहित्य, विक्री व वहातुकीला बंदी असताना मंगळवारी (ता. १४) पानमसाला, गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल वहातुक करणारा टेम्पो उमरगा पोलिसांना ताब्यात घेतला.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यासमक्ष पंचनामा झाल्यानंतर बुधवारी (ता.१५) टेम्पोमधील १७ लाख १५ हजार शंभर रूपये किंमतीचे साहित्य व टेम्पोची किंमत दहा लाख असा एकुण २७ लाख १५ हजार शंभर रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, उमरगा पोलिस यंत्रणेला हैदराबादहुन उमरगा मार्गे गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व पॅकींगसाठीचे साहित्य एका वहानातुन जात असल्याची गुप्त खबर मिळाली होती.

मंगळवारी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार, पोलिस निरीक्षक डी. बी. पारेकर, उपनिरीक्षक जी.पी. पुजरवाड यांच्यासह पोलिसांनी उमरगा शहर बाह्यवळण रस्त्यावर नाकाबंदी सुरु केली.  हॉटेल शौर्यवाडा जवळ पोलिसांनी अशोक लेलैंड कंपनीचा टेम्पो (क्रमांक एम एच १४ ई एम ९६५०) अडवला.

त्यामध्ये तपासणी केली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला, गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल काथ पावडर, सुगंधी सुपारी मिक्षर, पॅकींग करण्यासाठी लागणारे स्ट्रीप रोल, वजीर गुटखा याचे रिकामे मोठे पाऊचेस, गोवा १००० गुटखा याचे रिकामे पाऊचेसचा साठा आढळून आल्याने पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला.

दरम्यान बुधवारी सकाळी प्रतिबंधित अन्नपदार्थाचे सिलबंद गोणी फोडून पाहिले असता त्यात सुगंधित तंबाखू, घटकपदार्थ तसेच चूना, सुपारी, कात पदार्थाचे मिश्रण असल्याचे दिसून आले. या साहित्याची किंमत १७ लाख १५ हजार शंभर रूपये आहे तर टेम्पोची किंमत दहा लाख आहे.

 या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सुहास मंडलिक यांच्या फिर्यादीनुसार वहानचालक अर्जुन सुर्यकांत केदार, रा. मु. राजेवाडी, पो. महाळगी, ता. चाकूर (जि. लातुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक जी.पी. पुजरवाड तपास करीत आहेत.

गुटख्याचे साहित्य नेमके कुणाचे !

सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला सदृश्य प्रतिबंधित अन्नपदार्थ याचे उत्पादन, विक्री व वहातुक करणे बंदी असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. वहानचालक अर्जुन केदार याने साहित्य कोणाकडुन घेतले याची माहिती सांगीतली नाही. उमरग्यापासुन ४० किलोमीटर अंतरावरील कर्नाटकातील बसवकल्याण (जि.बिदर) येथून एका वाहनचालकाने वाहनचालक केदार याच्या ताब्यात साहित्य दिले.

त्याला सदरचे वाहन उमरगा येथे पोचविण्यासाठी सांगितले होते. मात्र त्याने उमरगा येथे साहित्य व वाहन कोणाला द्यावयाचे याचीहि काहीही माहिती दिली नाही. असे फिर्यादीत नमुद असले तरी हा सर्व प्रकार उघेडात आणण्यासाठी पोलिस यंत्रणेला काम करावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com