Latur Accident: भरधाव कारचा कहर! नायगावकडे जात असलेल्या दुचाकीस्वारांचा रात्री ९.३० वाजता जागीच मृत्यू, पोलिसांचा शोध सुरू
Road Accident: हडोळती येथील टोलनाक्याजवळ एका भरधाव कारने नायगावकडून लातूरकडे जात असलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात कोकलेगावचे माधव लोहगावे आणि संतोष चिंतले यांचा जागीच मृत्यू झाला.
हडोळती, (जि. लातूर) : हडोळती येथील टोलनाक्यापासून एक किलोमीटर अंतरावर नायगावकडून लातुरकडे जाणाऱ्या कारने कोकलेगाव (ता. नायगाव) कडे जाणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री ९.३० च्या दरम्यान घडली.