Video : बांधकाम व्यावसायिक बियानींचा तीन हजार कुटुंबांस मदतीचा हात

Nanded Photo
Nanded Photo

नांदेड : शहरात अनेक गर्भश्रीमंत आहेत. त्यांच्याकडे गडगंज पैशाला कामी नाही. परंतु, संकटात सापडलेल्या इतरांना मदतीचा हात देणे सर्वांनाच जमतेच असे नाही. बांधकाम व्यावसायिक संजय बियानी यांनी मात्र माणसाप्रती असलेला जिव्हाळा कायम असल्याचे त्यांच्या कृतीतुन सिद्ध केले आहे.

शासनाची अत्यावश्यक मदत पोहचेपर्यंत ज्या-ज्या कुटुंबास अत्यावश्यक वस्तूंची गरज आहे,  त्यांच्यासाठी स्वंयसेवी संस्था, व्यावसायिक, उद्योजक यांनी मोठ्या मनाने पुढे यावे असे आवाहन यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 


हेही वाचा- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेडला समिती
शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत संजय बियाणी यांनी शहरातील तीन हजार कुटुंबियांना पाच किलो गव्हाचा आटा, पाच किलो तांदुळ, मिर्ची पावडर, हळद, मिठ, गोडेतेल, साखर, साबण, निरमा अशा अत्यावश्यक साहित्याची किट तयार करुन त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे दोन दिवसात अडीच हजार किट सुपूर्द केल्या आहेत.  
 
ज्यांना खरच अन्न धान्याची गरज आहे. त्यांना आधार म्हणून काहीतरी तातडीने मदत करता येईल का असा विचार मनात आल्यानंतर संजय बियानी यांनी थेट सरकारला मदत न करता शहरातील तीन हजार कुटुंबियांना अन्नधान्याची किट देण्याचा निर्णय घेतला आहे. संजय बियानी शनिवारी (ता.चार) एप्रिलला पासून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे दोन हजार अन्न धान्याची किट पोहचिती करत आहेत. 


हेही वाचा- विडी कामगारांचे वेतन, आर्थिक मदत बँकेतून करावी
लॉकडाऊन परिस्थितीमुळे अनेक कुटुंबियांच्या हाताला काम नाही. त्यामुळे घरातील चुल दोन दोन दिवस पेटत नाही. त्यामुळे घरातील लेकरांचे हाल सुरू आहेत. अनेकांच्या पोटात भुकेने आग पडली आहे. गरजवंतांच्या नेमक्या याच क्षणी बियाणे डेव्हलपर्सचे मालक व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांनी हजारो गरीबांच्या पोटातील भूक शमविण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील दोन दिवसापासून संजय बियाणी हे आनंद नगरातील राजमॉल येथून मनाचा मोठेपणा दाखवत तीन हजार कुटुंबीयांना मदतीचा हात देत आहेत. यासाठी त्यांना प्रवीण बियाणी, अनिल मुंडा, भिकुलाल मुंडा, संदीप लड्डा, भगवान संपतवार, बजरंग संगणवार, संजय बोराटे, संदीप अन्नेवार, रवी बियाणी हे मदत करत आहेत.

काही वेळासाठी पंतप्रधान कोशसाठी निधी द्वावा असा मनात विचार आला होता. परंतु आपल्या आजुबाजुला देखील भुकेल्यांची कमी नाही. तेव्हा ही मदत पंतप्रधान कार्यालयास न देता मी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे दोन हजार कुटुंबासाठी आवश्यक साहित्यांची किट तयार करुन त्यांच्याकडे सोपविली आहे. त्याशिवाय इतर कामगारांसाठी ५०० किट तर, समाजातील गरीब गरजवंतांसाठी पाचशे अशा मिळुन तीन हजार किट तयार केल्या आहेत. 
-डॉ. संजय बियाणी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com