अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड व परिसरात असलेल्या बारा वाड्यांत हनुमान जयंती (Hanuman Jayanti) साजरी करण्यात येत नाही. तसेच हनुमान मंदिर (Hanuman Temple) नसल्याने हनुमंताची पूजा, अर्चा करण्यात येत नाही, हे विशेष आहे. तालुक्यातील जामखेड (Jamkhed) व किनगाव परिसरातील डोंगरावर जांबुवंताचे एकमेव मंदिर आहे. याठिकाणी नेहमीच धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरुच असते. यामुळे परिसरात जांबुवंत महाराजांचा जयजयकार केला जातो.