नविन कार घेण्यासाठी १० लाखाची मागणी करुन विवाहितेचा छळ

मारहाण करुन शारिरीक व मानसिक छळ, पतीसह सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल
वुमन क्राईम वसमत
वुमन क्राईम वसमत

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : नवीन कार घेण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये घेऊन ये, या कारणासाठी विवाहितेला मारहाण करुन शारीरिक व मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरुन पतीसह सासरच्या सात जणांवर मंगळवार (ता. २२) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमल अविनाश स्वामी राहणार एकदंत बिल्डिंग, दीपाली पार्क जवळ, मांजर्ली बदलापूर, जिल्हा ठाणे, ह. मू. बसवेश्वरनगर वसमत या विवाहितेस ता. ५ जानेवारी २०२० ते ता. १२ मार्च २०२१ या कालावधीत सासरच्या मंडळींनी माहेराहून नविन कार घेण्यासाठी १० लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करीत मारहाण केली.

हेही वाचा - 'हेलिकॉप्टर'च्या घिरट्यामुळे देगलूर मतदारसंघात चलबिचल

तसेच वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ करत शिविगाळ केली. याबाबत कोमल स्वामी यांनी मंगळवारी ( ता. २२ ) शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती अविनाश स्वामी, सासरा सतीश स्वामी, सासू जयश्री स्वामी, ननंद अश्विनी स्वामी सर्व राहणार मांजर्ली बदलापूर, जिल्हा ठाणे, मावस सासू सुरेखा स्वामी राहणार पुणे, चुलत सासरा सुरेश स्वामी राहणार लातूर व चुलत ननंद अंजली स्वामी राहणार पुणे या सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com