
नांदेड : काँग्रेसकडून राज्यातील विविध निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीने शिवसेना यापुढील काळातही आपला मित्र पक्ष असेल असे स्पष्ट केल्यामुळे माजी आमदार सुभाष साबणे यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. स्वबळाची भाषा खरी ठरल्यास देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेस विरोधात उमेदवारीसाठी साबणे यांचा दावा मजबूत होणार असून भाजपकडून त्यावेळी कोण उमेदवार असेल यावर ठरणार आहे. मात्र पुणे येथील उद्योगपतीचे हेलिकॉप्टर या मतदारसंघात फिरत असल्याने मतदार वर्गामध्ये चलबिचल सुरु झाली आहे.
माजी आमदार सुभाष साबणे हे देगलूर बिलोली मतदारसंघ 2014 ते 19 आणि मुखेड मतदारसंघ 2004 ते 2009 या कालावधीत शिवसेनेचे आमदार होते. त्यांच्या ज्येष्ठतेनुसार पक्षाने विधिमंडळातील तालिका सभापती म्हणून तसेच ओबीसी आयोगाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी टाकली होती. 2019 काल झालेल्या देगलूर- बिलोली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
राज्यात शिवसेना- भाजप युती असतानाही भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी देगलूरमध्ये हात दिल्याने साबणे यांच्या नशिबी तिसऱ्यांदा आमदारकी लागली नाही. काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब अंतापूरकर तेथून निवडून आले. परंतु कोरोना संसर्गामुळे अंतापूरकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे विधानसभेची जागा रिक्त झाली. येथील पोट निवडणुकीसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकून संभाव्य उमेदवार म्हणून अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांच्याकडे युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव पदाची जबाबदारी सोपवून सक्रिय राजकारणात उतरवले आहे.
महाविकास आघाडी जागा काँग्रेसला येत आहे, ही बाब लक्षात घेऊन पूर्वीचे शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे यांनी सावध पावले टाकण्यास सुरवात केली आहे. या मतदार संघात काही दिवसांपूर्वी काॅग्रेसच्या झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले, तर काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने निवडणूक काँग्रेसला स्वबळावर लढवावी लागेल की काय अशी चर्चा होत आहे.
येथे क्लिक करा - कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले
मात्र दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील उद्योगपतींचे हेलिकॉप्टर देगलूर मतदार संघात व काॅग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या घराभोवती घिरट्या घालत असून त्यांच्या आर्थिक उद्योगामुळे देगलूरचा उमेदवार बदलण्यासाठी काँग्रेसची काही मंडळी सक्रिय होत चालली आहे. अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकरयांना उमेदवारी दिली तर देगलूरमध्ये देखील पंढरपूर पॅटर्न घडवून भाजप सुभाष साबणे यांना उमेदवारी देऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.