बीड जिल्ह्यातील सरपंचाने साधला डाव, अलगीकरणातील महिलेचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

गेवराई तालुक्यातील ठाकरवाडी तांडा येथील एक कुटुंब थेऊर (जि. पुणे) येथे गुराळाच्या कामावर गेले होते. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन असल्याने हे कुटुंब गावी आले होते. गावी आल्यावर सरपंच समाधान उदरभरे याने अलगीकरण करत शेतात राहण्यास सांगितले होते.

गेवराई (जि. बीड) - अलगीकरणात ठेवलेल्या मजूर महिलेचा सरपंचाने विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी महिलने दिलेल्या तक्रारीवरून चकलांबा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

तालुक्यातील ठाकरवाडी तांडा येथील एक कुटुंब थेऊर (जि. पुणे) येथे गुराळाच्या कामावर गेले होते. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन असल्याने हे कुटुंब गावी आले होते. गावी आल्यावर सरपंच समाधान उदरभरे याने अलगीकरण करत शेतात राहण्यास सांगितले होते.

हेही वाचा - कोरोनाचे संकट - दिलपसंदच्या शेतात सोडल्या मेंढ्या! 

त्यांना काही दिवसांनी किराणा वाटप करण्यासाठी सरपंच उदरभरे किराणा साहित्य किट घेऊन आला; परंतु सदरील कुटुंबास या किटचे वाटप करण्यात आले नाही. यावेळी सरपंच उदरभरे याला विचारपूस केली असता त्याच्यासह तांड्यावरील मित्राने या कुटुंबातील महिलेचा विनयभंग केला. त्यामुळे सरपंच समाधान उदरभरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harassment of a woman in Beed district