Fall in Chickpea Prices Below MSP: हरभऱ्याला बाजारात हमीभावापेक्षा ७००-८०० रुपये कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नाफेडच्या शासकीय खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे.
नळेगाव: यंदा हरभऱ्याला खासगी बाजारामध्ये शासकीय हमीभावापेक्षा ७०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल कमी भाव मिळत असल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांत हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांची धाव दिसून येत आहे.