esakal | Video - पोलिसांच्या कष्टाला फळ, गुलाब पुष्पवृष्टीने झाले भाऊक
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

पोलिसांचे प्रोत्साहन वाढावे व आम्ही संकटसमयी आपल्या सोबत आहोत हे दाखवून देण्यासाठी तरूण पीढीने समोर येऊन त्यांच्या अंगावर गुलाबपुष्प उधळून त्यांना हिम्मत दिली. असा प्रकारचे स्वागत पाहून पोलिस व राज्य राखीव पोलिस बलाचे जवान भाऊक झाले. 

Video - पोलिसांच्या कष्टाला फळ, गुलाब पुष्पवृष्टीने झाले भाऊक

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. या वश्‍वी महामारीला पराजीत करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलिस विभाग मागील एक महिण्यापासून रस्त्यावर बंदोबस्त करीत आहेत. पोलिसांचे प्रोत्साहन वाढावे व आम्ही संकटसमयी आपल्या सोबत आहोत हे दाखवून देण्यासाठी तरूण पीढीने समोर येऊन त्यांच्या अंगावर गुलाबपुष्प उधळून त्यांना हिम्मत दिली. असा प्रकारचे स्वागत पाहून पोलिस व राज्य राखीव पोलिस बलाचे जवान भाऊक झाले.

कोरोना या महाभंयकर आजाराला हरवायचे असेल तर नागरिकांनी घराबेहर पडू नये हा एकमेव उपाय आहे. जिल्ह्याच्या उंबरठ्यावर आलेला कोरोना आपल्या जिल्ह्यात येता कामा नये यासाठी पोलिस बांधव मागील एक महिण्यापासून सतत दिवसरात्र नांदेडकरांच्या सेवेत आहेत. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनासह आरोग्य विभाग व महापालिका प्रशासनातील सर्वच अधिकारी व करमचारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नांदेडकरांच्या जिवीतास धोका पोहचु नये यासाठी पोलिस कर्मचारी जागोजागी नाकाबंदी करुन नागरिकांना घरी जाण्याचा सल्ला देत आहेत. काही रिकामटेकड्या मंडळीवर दंडात्मक कारवाईचाही बडगा उगारण्यात येत आहे. 

हेही वाचा - संत बाबा नरेंद्रसिंघ, संत बाबा बलविंदरसिंग यांची लंगरसेवा

दबावाला पोलिसांनी भिक घातली नाही.

दोन दिवसांपूर्वी इतवारा पोलिस ठाण्यावर एक जमाव संचारबंदीचे उल्लंघन करून परदेशी पाहूण्यावर गुन्हे दाखल करु नये यासाठी जमला होता. विशेष म्हणजे हे इंडोनेशिया व दिल्ली येथील बारा नागिकांना लपवून ठेवण्यात आल्याचा ठपका पोलिसांनी संबंधीतावर लावलेला आहे. प्रकरणांची व्याप्ती लक्षात घेता पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी राज्य राखिव पोलिस बलाच्या तीन कंपन्या बोलावून घेतल्या. बंदोबस्ताचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या सांगण्यावरून फिक्स पॉईन्ट देऊन या बारा लोकांवर अखेर गुन्हे दाखल केले. कोणाच्या दबावाला पोलिसांनी भिक घातली नाही.

इतवारा परिसरातून काढला रुटमार्च

राज्य राखीव पोलिस बल व इतवारा पोलिस यांनी इतवारा परिसरातून बुधवारी (ता. आठ) पथसंचलन करून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. यावेळी या पोलिसांच्या पथसंचलनावर काही तरुण युवकांनी गुलाब पुष्प टाकून त्यांचे स्वागत केले. रस्त्यावर फुलांच्या पाकळ्या पसरल्या होत्या. अशा प्रकारचे स्वागत पाहून पोलिस कर्मचारीही भाऊक झाले. आम्ही आपल्या सोबत आहोत, आपल्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत, तुम्ही देशासाठी व कुटुंबासाठी घारतच राहा असा सल्ला ही मंडळी देत आहे.  

loading image
go to top