
किल्लेधारूर : बीड ,धारूर तालुक्यातील हसनाबाद पासून ते राज्य मार्ग क्र.२३२ पर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत डांबरी रस्ता मंजूर आहे. सदरील रस्त्याचे काम प्रगतीपथावर असताना काही शेतकऱ्यांनी हा रस्ता जाणून बुजून अडवला असून यामुळे रस्त्याचे काम थांबले आहे.हा रस्ता तात्काळ व्हावा यासाठी हसनाबाद ग्रामस्थांनी तहसीलदार यांना ता.२७ रोजी निवेदन देत पुढील दोन दिवसात मार्ग नाही निघाला तर उपोषणाला बसणार असे निवेदन दिले होते.