esakal | Video : ४५ हजारांची हातभट्टी दारू नष्ट; महिलेवर गुन्हा : वाचा कुठे?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मानोली (ता. मानवत, जि. परभणी) शिवारातील एका आखाड्यावर हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यावरून या पथकाने सोमवारी (ता. चार) सकाळी ११ वाजता त्या ठिकाणी छापा टाकला.

Video : ४५ हजारांची हातभट्टी दारू नष्ट; महिलेवर गुन्हा : वाचा कुठे?

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : मानोली (ता. मानवत, जि. परभणी) येथील शिवारातील एका अखाड्यावरील शेतात हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन असल्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकांला मिळाली. यावरून पोलिसांनी सोमवारी (ता. चार) सकाळी ११ वाजता या ठिकाणी छापा मारून ४५ हजार रुपयांचे सडके रसायन नष्ट करून आरोपी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

मानोली (ता. मानवत, जि. परभणी) शिवारातील एका आखाड्यावर हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यावरून या पथकाने सोमवारी (ता. चार) सकाळी ११ वाजता त्या ठिकाणी छापा मारला असता त्या शेतातील आखाड्यावर हातभट्टी दारू तयार करण्याचे सडके रसायन दोन टाक्यांमध्ये भरले असल्याचे निदर्शनास आले. 

हेही वाचा : परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

 सडके रसायन करण्यात आले नष्ट
पोलिसांनी याची पाहाणी केली असता तीन प्लॅस्टिक टाक्यांसह इतर कॅनमध्ये सडके रसायन भरून ठेवण्यात आले होते. त्याच बरोबर  गुळाचे, नवसागरचे, बिब्याचे पाणी टाकूण भिजण्यासाठी घातलेले सडके रसायन होते. पोलिसांच्या पथकाने या सर्व टाक्या व कॅन त्याच शेतात सांडून नष्ट केल्या. 

हेही वाचा व पहा : Video : परभणीचे ‘हे’ गाडगेबाबा देतात स्वच्छतेचा संदेश

महिलेवर गुन्हा दाखल
या प्रकरणी मुद्देमालासह आरोपी महिलेला मानवत पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक एच. जी. पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक हनुमान कच्छवे, पोलिस हवालदार सखाराम टेकुळे, पोलिस हवालदार जगदीश रेड्डी,  श्रीकांत घनसावंत, अतुल कांदे, महिला पोलिस कॉन्स्टेबल पूजा भोरगे, चालक गजेंद्र चव्हाण यांनी मिळून केली.
 

loading image
go to top