‘हजूर’ साहेब रेल्वे स्थानकाची स्वच्छता 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

हजुर साहेब रेल्वेस्थानकावर रविवारी (ता. १९) जानेवारी रोजी सकाळी सात ते दहापर्यंत नांदेड रेल्वे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहीम राबविली. 

नांदेड : येथील हजुर साहेब रेल्वेस्थानकावर रविवारी (ता. १९) जानेवारी रोजी सकाळी सात ते दहापर्यंत नांदेड रेल्वे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहीम राबविली. 

नांदेड रेल्वे स्थानकावर विविध ठिकाणी प्लास्टिकचा कचरा आढळून येत आहे. रेल्वे स्थानकावरील कचरा स्वच्छता कंत्राटदार उचलून स्थानक स्वच्छ ठेवत आहे. यापैकी बऱ्याच प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर प्लास्टिक नांदेड रेल्वे स्थानकावरून मुदखेडकडे जात असतांना येणाऱ्या रेल्वेपूलाखाली , रेल्वेपटरीवर आणि रेल्वेपटरीच्या दोन्ही बाजूस जमा झाला होता. हा संपूर्ण कचरा रविवारी (ता. १९) घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत उचलण्यात आला. 

हेही वाचाजिल्हाभरात पल्स पोलिओ लसीकरणास सुरवात

विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंगांची उपस्थिती

विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली  विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दिवाकर  बाबू, श्री मांगाचारयेळू, विनू देव सचिन, श्री जॉन बेनहर आणि आदी रेल्वे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. स्वच्छता मोहिमेनंतर स्वच्छ रेलपटरी पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले. 

प्रवाशांनीही स्वच्छता ठेवावी

प्रवाशांनी कचरा पेटीतच टाकावा, इतरत्र टाकू नये. तसेच श्री सिंग यांनी कळविले आहे की अशा प्रकारची स्वच्छता मोहीम नांदेड विभागातील इतर रेल्वे स्थानकावर सुद्धा घेण्यात येईल. रेल्वे प्रशासन स्वच्छता ठेवण्याचे प्रयत्न करत आहे, प्रवाशांनीही स्वच्छता ठेवावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
-श्री उपिंदर सिंग, विभागीय व्यवस्थापक, नांदेड. 

येथे क्लिक करासासरवडीत जावयाचा थयथयाट, म्हणाला तलाक.....

रानडुकराच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू 

नांदेड : रानडूकराच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वडगाव (ता. मुखेड)  येथील ३६ वर्षीय युवकाचा अखेर ता. १८ जानेवारी रोजी मृत्यू झाला. 

दापका गु. (ता. मुखेड) येथुन चाँदसाब खादरसाब सय्यद (वय ३६) हा बुधवारी (ता. १५) जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून बाऱ्हाळीला येत होता. त्याची दुचाकी हिरानगर फाटा येथे येताच त्याला रस्ता ओलांडणाऱ्या रानडूकराने अचानक जोराची धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला होता. शासकिय यंत्रणेची १०८ आणि १०२ क्रमांकाच्या दोन्ही रूग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे त्यच्यावर वेळेत उपचार होऊ शकला नाही. बाऱ्हाळी येथील आरोग्य केंद्रात प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला नांदेडच्या विष्णुपूरी येथिल शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दोन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि अखेर शनिवारी (ता. १८) जानेवारी रोजी त्याचा मृत्यु झाला. त्याच्या पार्थिवावर रविवारी (ता. १९) जानेवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Hazur' Saheb Railway Station Cleaning