हिंगोलीत पोलिसासांठी आरोग्य तपासणी शिबीर; ६९ कर्मचाऱ्यांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health check-up camp for police in Hingoli Examination of 69 employees

हिंगोलीत पोलिसासांठी आरोग्य तपासणी शिबीर; ६९ कर्मचाऱ्यांची तपासणी

हिंगोली : येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील संत नामदेव सभागृहात सोमवारी ता. २३ पोलिसासांठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले असुन ते तीन दिवस चालणार आहे. पहिल्या दिवशी ६९ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्हा पोलीस दलातील कार्यरत अधिकारी व अंमलदार यांचे आरोग्य सुदृढ रहावे तसेच काही आरोग्या समस्या असतील तर त्याचे वेळीच निदान व विलाज होऊन जिल्हातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अधिक समक्षपणे कर्तव्य करावे या उद्देशाने नेहमीच विवीध आरोग्य विषयक उपक्रम घेत असतात.

त्याव अनुषंगाने स्वस्थ पोलीस , सशक्त पोलीस , सक्षम पोलीस " या संकल्पनेतुन जिल्हयातील पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील संत नामदेव सभागृहात सोमवारी मोफत आरोग्य तपासणी शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर तीन दिवस चालणार आहे. आरोग्य तपासणी शिबीराचा शुभारंभ संत नामदेव सभागृहात पोलीस अधीक्षक राकेश कलासागर व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख , जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. मंगेश टेहरे , डॉ. गोपाल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर आरोग्य शिबीरात जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व विभागीतील तज्ञ डॉक्टर्स व त्यांचे अधिनस्त स्टाफने अत्याधुनिक तपासणी उपकरणासह उपस्थित राहुन जिल्हयातील ६९ पोलीस अधिकारी व अंमलदार यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य विषयक औषधोपचार करून सल्ला देण्यात आला. कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे व सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी इंडेकर यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Health Check Up Camp For Police In Hingoli Examination Of 69 Employees

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top