
बीड : कोविड १९ संसर्गाच्या काळात जिल्हा रुग्णालयात औषधी व साहित्य खरेदीत अनियमितता आढळल्याचे लेखा परीक्षण अहवालात समोर आले आहे. कामकाजात गंभीर आक्षेप असल्याचे नमूद करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना निलंबित करून तीन महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण करण्याची घोषणा मंगळवारी (ता. २५) आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.