
छत्रपती संभाजीनगर : मॉन्सूनच्या आगमनाला आठ-दहा दिवस बाकी आहेत. मात्र, मॉन्सूनच्या आगमनाची चाहूल देणारा मॉन्सूनपूर्व पाऊस जोरदार बरसत आहे. बुधवारी (ता. २८) गेल्या २४ तासांत मराठवाड्यात दमदार पाऊस बरसला आणि आठपैकी पाच जिल्ह्यांतील ३४ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ३४ पैकी निम्मी महसूल मंडळे एकट्या जालना जिल्ह्यातील आहेत.