Heavy Rain: आठ दिवसांपासून सोयाबीन पाण्यात; शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले, तेरणेच्या पाण्यामुळे निघाले दिवाळे
मदनसुरीसह मंडळातील शेतकरी अतिवृष्टी आणि तेरणा धरणाच्या पाण्यामुळे पीक नष्ट झाल्याचे सांगत आहेत. कर्ज, बियाणे, खतं वापरून केलेली मेहनत फसली असून शेतकऱ्यांना तातडीची मदत आवश्यक आहे.
मदनसुरी : अतिवृष्टी आणि तेरणेच्या पाण्यामुळे शेतात सोयाबीनचं पीक दहा फूट पाण्यात बुडालं आहे. कर्ज घेऊन, बियाणे, खतं, औषधं वापरून केलेली मेहनत आणि गुंतवणूक फसली आहे.