
Marathwada Rain
sakal
नांदेड : मराठवाड्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही भागांत अजूनही पूरस्थिती कायम आहे. दरम्यान, दोन-तीन दिवसांच्या खंडानंतर काही भागांत शुक्रवारी (ता. २६) पाऊस झाला. नांदेड शहरात सकाळपासून रिमझिम सुरू असलेल्या पावसाने सायंकाळी काही काळासाठी जोर धरला. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले.