
Heavy Rain
sakal
लातूर : लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. त्यात काही वेळा तर अतिवृष्टी झाली आहे. यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या १४५ प्रकल्पांपैकी ११३ प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले आहेत. अनेक वेळा या प्रकल्पातून पाणी नदीच्या पात्रात सोडून देण्याची वेळ जलसंपदा विभागावर आली आहे.