
अहमदपूर : तालुक्यात मागील तीन दिवसापासून कमी अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसाने सोमवारी (ता. १८) पहाटे जोरदार हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील २८ तलावांपैकी सात तलाव शंभर टक्के भरली आहेत. सेनकुडन गावाजवळील मण्यार नदीवरील पूल वाहून गेल्याने तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांनी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.