barshi rain flood
sakal
बार्शी - बार्शी शहर अन् तालुक्यात रविवारी रात्री अतिवृष्टी झाली असून सर्व पिके पाण्याखाली बुडाली आहेत. तर नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. घरांत, वस्ती, शाळांमध्ये पाणी शिरले आहे. शेळ्या वाहून गेल्या आहेत. ग्रामीण भागात हाहाःकार उडाला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांची वाहतूक बंदमुळे संपर्क तुटला आहे.