esakal | निलंग्यासह तालुक्यात जोरदार पाऊस, शाळेचे कंपाऊंड गेले वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

औराद शहाजनी (जि.लातूर) : महामार्गालगत गटारीची व्यवस्था न झाल्यामुळे रस्त्यावरून वाहून जाणारे पाणी.

निलंग्यासह तालुक्यात जोरदार पाऊस, शाळेचे कंपाऊंड गेले वाहून

sakal_logo
By
राम काळगे, दत्ता बोंडगे

निलंगा (जि.लातूर) : निलंगा (Nilanga) शहरासह तालुक्यात रविवारी (ता.१८) सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस (Rain) झाला, तर औराद शहाजानी येथे एका तासांत ५५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने गाव व परिसरातील रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते. तालुक्यात खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण (Latur ) झाल्या आहे. अधूनमधून पाऊस पडत असल्याने पिकाची परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र या पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिके संकटात आली आहे. गोगलगाय पिके फस्त करित आहेत. शिवाय औराद शहाजानी व परिसरात आज सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी (Farmer) वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र औराद शहाजनी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 के येथील रस्त्यालगत असलेल्या पाण्याची व्यवस्था न केल्यामुळे रस्त्यावरूनच ओढ्यासारखे पाणी वाहू लागले होते. या पाण्यामुळे रस्त्यालगत असलेल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले होते. तसेच या महामार्गालगत असलेल्या महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संपूर्ण पाणी गेल्यामुळे तेथील कंपाउंड वाहून गेली आहे. heavy rain hit nilanga tahsil of latur district glp 88

हेही वाचा: दोघांचे प्रेम पाहून पोलिस भारावले! चार किलोमीटर पळवल्यानंतर...

औराद शहाजानी येथील शेळगी मोड लगत असलेल्या महामार्गावरील फुलाचे पान पुलाचे काम गेल्या तीन वर्षापासून रखडल्यामुळे हा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या पुलाचे काम व रस्त्यालगत असलेली व्यापारी यांचा वाद उच्च न्यायालयात गेल्यामुळे हा पूल रखडला आहे. पुलाचे खड्डे तयार करून बुजविण्यात आले होते व परत पुन्हा खड्डे खोदण्यात आले आहेत. परंतु अद्यापही या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिक व व्यापारी वर्ग यांचे नुकसान होत आहे. आज झालेल्या पावसामुळे शेतीच्या सखल भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पिकांमध्ये पाणी साचले होते. औराद शहाजानी येथील जलविज्ञान प्रकल्पात आतापर्यंत एकूण ३६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आज सायंकाळच्या सुमारास झालेल्या एक तास पावसाची नोंद ५५ मिलिमीटर झालेली आहे. शिवाय तालुक्यातील शिवणी-कोतल, हाडगा, मसलगा, निटूर, केळगाव, आंबुलगा, हलगरा, तळीखेड, झरी, यासह आदी भागात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

loading image