Latur Rain : लातूरच्या उजनीत पावसाचे तांडव, पाणी शिरले गावात

उजनी (ता. औसा, जि.लातूर) : पावसामुळे तेरणा नदीने रौद्र रूप धारण केल्याने येथील बाजारपेठेत पाणी शिरले आहे.
उजनी (ता. औसा, जि.लातूर) : पावसामुळे तेरणा नदीने रौद्र रूप धारण केल्याने येथील बाजारपेठेत पाणी शिरले आहे.Terna River, Latur

उजनी (जि.लातूर) : उजनी (ता.औसा) (Ausa) परिसरात पुन्हा एकदा पावसाने थैमान घातले असुन सोमवारी (ता.२७) रात्रभर पावसाचे तांडव पाहिला मिळाले. यामुळे तेरणा नदीने (Terna River) रुद्र रूप धारण केले असून नदीचे पाणी येथील बाजार चौकात मंगळवारी (ता.२८) शिरले आहे. पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असल्याने येथील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. येथील काही व्यवसायांना (Rain In Latur) या पाण्याने विळखा घातला होता. दुसरीकडे शेती व पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे सोयाबीन, उडीद, मूग आदीं पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. उजनीसह एकंबी, एकंबीवाडी, एकंबी तांडा, अशीव, कमालपुर, चिंचोली काजळे, मासूर्डी, टाका, बिरवली, शिवली आदी गावांना या पावसाचा फटका बसला आहे.

उजनी (ता. औसा, जि.लातूर) : पावसामुळे तेरणा नदीने रौद्र रूप धारण केल्याने येथील बाजारपेठेत पाणी शिरले आहे.
Hingoli Rain : कयाधूच्या पुलावरुन पाणी,वीस गावांचा संपर्क तुटला

अगोदरच बाजारपेठेत सोयाबीन पिकाचे दर कोसळत असताना आता पावसामुळे पिके पूर्णतः गेल्याने शेतकरीही पुरता कोसळून गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या पिकांवर संपूर्ण आर्थिक गणित अवलंबून होते. शेतकऱ्याने जी स्वप्ने पाहिली होती ती सर्व पावसाच्या पाण्यात गेल्याचे चित्र आहे. मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरासोबत शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील आसवांचा पूर आल्याचे पाहायला मिळाले. हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी पूर्णतः हताश झाले आहेत. शासनाने तरी सदरील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com