अहमदपूर - तालुक्यात पावसाचा जोर वाढला असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून मन्याड नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या तीन लोकांची सुटका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे..तालुक्यातील चिलका या गावात नदी पात्रा शेजारी खडी कामावर असलेले अली कौसर (23 वर्षे) रा. बिहार, रामकिशन भुजंग कांबळे (45 वर्ष) रा. जाम हिप्परगा, ता. मुखेड व नंदकुमार शंकरराव वळसे (50 वर्षे) रा. मंगनाळ, ता. कंधार हे तीन मजूर शुक्रवारी (ता. 26) रोजी आपले काम आटोपून शेडमध्ये झोपी गेली..दरम्यान रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने नदीला पूर आला व या शेड मधे वास्तव्यास असलेले हे तीन मजूर पूर्णपणे पाण्याने वेढले गेले. शनिवार (ता. 27 रोजी) सकाळी पहाटे झोपीतून उठल्यावर यांना लक्षात आले की आपण पुरामध्ये अडकलो आहोत.सदरील माहिती प्रशासनाकडे सकाळी आठ वाजता पोहोचल्यानंतर त्यांची सुटका करण्याच्या हालचाली चालू झाल्या. अहमदपूर येथील अग्निशामन दल व लातूर जिल्हा पोलीस यांच्या मदतीने व नामदेव ज्ञानोबा माने यांच्या सहकार्याने तीन तासाच्या प्रयत्नाने या तीन कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली..भर पावसात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थितीचिलका येथे कामगार पाण्यात अडकल्याची माहिती मिळतात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे त्या ठिकाणी उपस्थित झाले. पुरात अडकलेल्या या तीन कामगाराची सुखरूप सुटका होईपर्यंत थांबून त्यांना या पुरात अडकलेल्या कामगारांना धीर दिला..लातूर पोलीस दल व अहमदपूर अग्निशामन दलाची कामगिरीलातूर पोलीस दलाचे रियाज देशमुख तर अहमदपूर येथील अग्निशामन दलाचे कैलास सोनकांबळे, प्रशांत गायकवाड, अजित लाळे, प्रकाश जाधव या कर्मचाऱ्यांनी पाण्यात अडकलेल्या या कामगाराची सुटका करण्याचे काम केले.या वेळी प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनर यांची उपस्थिती होती..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.