Rain Update : निलंगा तालुक्यात दहाही मंडळांत अतिवृष्टी; ग्रामीण भागात पावसाने केली जमिनीची दैना, ओढे-नद्यांना पाणी

शहरासह तालुक्यात सोमवारी (ता.१०) रात्री झालेल्या पावसामुळे अक्षरशः झोडपून काढले. तालुक्यातील दहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.
rain update
rain updatesakal
Updated on

निलंगा: शहरासह तालुक्यात सोमवारी (ता.१०) रात्री झालेल्या पावसामुळे अक्षरशः झोडपून काढले. तालुक्यातील दहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तेरणा व मांजरा नदीला काही प्रमाणात पाणी आले. ओढे-नाले तुडूंब भरले आहेत. चार महसूल मंडळात शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने चोहीकडे पाणीचपाणी अशी स्थिती निर्माण झाली होती.

सोमवारी सायंकाळी व रात्री शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरवात झाली. हवामान विभागाने मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला, तरीही निलंगा तालुक्याला सर्वाधिक फटका पावसाचा बसला आहे. या जोरदार पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

सखल भागात पाणी साचले असून ओढ्या, नाल्यांना पूर आला होता.शिवाय तालुक्यातील बडूर व मसलगा मध्यम प्रकल्पात पाणी पातळीत वाढ झाली. ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या ओढ्यांना पाणी आल्यामुळे आणि ग्रामीण भागातील रस्ते बंद झाले होते. या पाण्यामुळे शेतकऱ्यांना शेताकडे जाण्याचे मोठी गैरसोय झाली आहे.

निलंगा शहरातील सर्व रस्ते जलमय झाले असून काही घरात पाणी शिरले. शहराजवळील ओढ्याला पाणी आले असून सर्वच शिवारातील ओढे तुडूंब भरून वाहत आहे. ग्रामीण भागातील जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

तालुक्यातील पावसाची नोंद

तालुक्यात मंगळवारी सकाळपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये एकूण दहापैकी चार महसूल मंडळात शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तालुक्यातील मंडळात निलंगा १२९, कासारबालकुंदा ८२, मदनसुरी- १०२, कासार सिरसी ८०, हलगरा ९०, आंबुलगा ९९, भुतमुगळी ८०, निटूर १००, पानचिंचोली १११, औराद शहाजानीमध्ये ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, अशी माहिती तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.