esakal | Heavy Rain: वडीगोद्री विभागात पावसाने पिकांचे मोठे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rain

अनेकांच्या शेतातील ऊभा ऊस पडला आहे. सतत पडलेल्या पावसामुळे भागातील पिकांचे नुकसान झाले असून अन्य भाजीपाला पिकेही अडचणीत आली आहेत

Heavy Rain: वडीगोद्री विभागात पावसाने पिकांचे मोठे नुकसान

sakal_logo
By
दिलीप दखने

वडीगोद्री (जालना): विभागात मंगळवार (ता.31) रोजी रात्री झालेल्या पावसाने ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात वडीगोद्री, अंतरवाली सराटी, नालेवाडी, आदी ठिकाणी ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात मंगळवार (ता.31) रोजी रात्री दोन वाजेपासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत वादळी वाऱ्यासह, विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस पडला. या पावसाने नदी, नाल्यांना पाणी आले. नदीच्या काठावरील ऊस, मोसंबी, कापूस, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

अनेकांच्या शेतातील ऊभा ऊस पडला आहे. सतत पडलेल्या पावसामुळे भागातील पिकांचे नुकसान झाले असून अन्य भाजीपाला पिकेही अडचणीत आली आहेत. शेतातील ऊस पावसामुळे मोडल्याने काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने पिके खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. सध्या उसाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. अशावेळी पावसामुळे झालेले नुकसान शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी असल्याचे समजते. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन मदत मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

loading image
go to top