georai heavy rain
sakal
गेवराई - बीडच्या गेवराईतील विविध भागाला, रविवारी रात्री पून्हा मुसळधार पावसाने अक्षरश झोडपून काढले असून, शहराला पाण्याचा वेढा पडला आहे. शहराच्या पश्चिम, उत्तर, दक्षिण भागाकडच्या गावातील नागरीकांचे रस्ते पाण्यात गेले आहेत. त्यामुळे, संपर्क तुटला आहे. काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, उच्चभ्रू वस्ती असलेला श्री दत्त पार्क एका बाजुने पाण्याने वेढल्याने चिंता व्यक्त केली जात असून, कुठलीही घटना घडू नये, गेवराई तहसील व नगर परिषदेच्या प्रशासन सतर्क झाले आहेत.