
Beed Flood
sakal
बीड : जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने हाहाकार माजवल्याने मध्यरात्रीपासून जिल्हाभरात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली. सोमवारी (ता. १५) दुपारपर्यंत ३६ गावांचा संपर्क तुटला हेाता. पुरामुळे दोघांचा मृत्यू झाला, तर ५१ जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले. एनडीआरएफचे पथक तळ ठोकून आहे.