
लातूर, नांदेड : लातूर जिल्ह्यात बुधवारी (ता. २७) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. रस्ते, पुलांवरून पाणी वाहत असल्याने जिल्ह्यातील ४९ मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मांजरा, निम्न तेरणा धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यातील २९ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.