Marathwada Rain Update : मराठवाड्यातील ४४ महसूल मंडळांत अतिवृष्टी; हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक पाऊस
Flood Alert Marathwada : मराठवाड्यात २४ तासांत अतिवृष्टीने ४४ महसूल मंडळांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. हिंगोली, जालना, संभाजीनगरमध्ये मोठा पाऊस. पाऊस परतल्यामुळे ओढे, नद्या भरले, आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : पावसाने रविवारी (ता. २७) उसंत घेतली. पण, मागील २४ तासांत मराठवाड्यातील ४४ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात ५२.४ मिलिमीटर (मिमी), जालना ४७.१ आणि छत्रपती संभाजीनगर ३९.२ मिमी पावसाची नोंद झाली.