
Heavy Rains
sakal
धाराशिव : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे जमीन खरडून गेली आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने दोन लाख २३ हजार हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्येही जोरदार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.