निलंगा - निलंगा शहरासह तालुक्यात रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने मांजरा व तेरणा नदी दुथडी भरून वाहत आहेत ठिकठिकाणी रस्ते पाण्यात गेल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे खरिप हंगामातील पीके वाया गेली आहेत. या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.