Heavy Rainfall In Jalna: जल रात्र! शहरासह जिल्ह्याभरात थैमान, भोकरदनमध्ये सर्वाधिक १६५ मिमी
Maharashtra Rain: जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेती व जनावरांचे मोठे नुकसान झाले असून, गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जालना : शहरासह जिल्हाभरात पावसाचे थैमान सुरूच आहे. शनिवारी (ता. २८) मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला असून पिके वाहून गेली आहेत.