Heavy Rain In Beed: बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मांजरा आणि सिंदफणा नद्यांनी महापूराचा रौद्र अवतार धारण केला. यात अनेक गावे जलमय झाली असून प्रशासनाने जीव धोक्यात घालून नागरिकांची सुटका केली.
बीड : जिल्ह्याला पुन्हा एकदा अतिवृष्टी आणि महापुराचा तडाखा बसला आहे. शिरूर कासार, पाटोदा आणि बीड तालुक्यांमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, अनेक गावे आणि वस्त्या जलमय झाल्या आहेत.