Beed Flood: ‘एनडीआरएफ’च्या तुकडीसह जवान बीडमध्ये तळ ठोकून
NDRF Team: बीड जिल्ह्यातील सलग अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, सैन्य व एनडीआरएफ पथकांनी बचावकार्य सुरू ठेवले आहे. आतापर्यंत १६८४ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
बीड : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली, तरी तत्पूर्वी तीन दिवस सलग झालेली अतिवृष्टी, महापुराने जनजीवन अद्यापही विस्कळित आहे. सैन्य दलाची तुकडी आणि ‘एनडीआरएफ’ची तुकडी अद्यापही जिल्ह्यात तळ ठोकून आहे.