esakal | हिंगोली जिल्ह्यात पाच मंडळात अतिवृष्टी, कयाधुला पूर 
sakal

बोलून बातमी शोधा

karpra

मागील चोवीस तासात हिंगोली जिल्ह्यात २७.२९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस पाच मंडळात सर्वाधिक झाल्याने तेथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वच तालुक्यात हा पाऊस कमी अधिक प्रमाणात झाला आहे. पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस समाधानकारक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पुल येथून वाहणाऱ्या कयाधु नदीला पूर आला होता. 

हिंगोली जिल्ह्यात पाच मंडळात अतिवृष्टी, कयाधुला पूर 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासात शुक्रवार (ता.दहा) सकाळी आठ वाजेपर्यंत २७.२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये पाच मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.  

जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी (ता.नऊ) जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे. सर्वच तालुक्यात हा पाऊस कमी अधिक प्रमाणात झाला आहे. पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस समाधानकारक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

हेही वाचा - Video ; रात्रीच्या दमदार पावसाने परभणी जिल्हा ओलाचिंब....

या ठिकाणी अतिवृष्टी 
जिल्ह्यात पाच मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यात औंढा, येहळेगाव, साळणा, हयातनगर व हट्टा मंडळाचा समावेश आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासात २७.२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

हेही वाचा - ‘लक्ष्मी’च्या लग्नाकरिता ‘साईप्रसाद’ची मदत

मंडळनिहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे 
हिंगोली तालुक्यातील हिंगोली मंडळात १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खांबाळा १३, माळहिवरा १४, सिरसम ८, बासंबा २०, नरसी नामदेव १२, डिग्रस २० एकूण १०३, सरासरी १४.७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

कळमनुरी मंडळ
कळमनुरी मंडळात ४३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर नांदापुर ५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बाळापुर ३३ डोंगरकडा २४, वारंगाफाटा १४ वाकोडी २७, एकूण १९४ तर सरासरी ३२.३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

सेनगाव मंडळ
सेनगाव मंडळात १० मिलीमीटर पाऊस झाला गोरेगाव, आजेगाव मंडळात आठ, साखरा निरंक, पानकनेरगाव आठ, हत्ता १४ एकूण ४८ तर सरासरी आठ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

वसमत मंडळ

वसमत मंडळात आठ मिलीमीटर पाऊस झाला आहे. हट्टा मंडळात ५९ मिलीमीटर पाऊस झाला. गिरगाव १३, कुरूंदा ४०, टेभूर्णी ४१, आंबा ३९, हयातनगर ५८ एकूण २५८ तर सरासरी ३६.८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

औंढा नागनाथ
औंढा नागनाथ मंडळात ५२ मिलिमीटर पाऊस झाला तर जवळा बाजार १६, येहळेगाव ६३, साळणा ६० तर एकूण १९१ सरासरी ४७.७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर जिल्ह्यात सरासरी २७.९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

 

(संपादन ः राजन मंगरुळकर)