हिंगोली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

Hingoli Rain
Hingoli Rain

हिंगोली : जिल्‍ह्यात मागच्या काही दिवसांपासून पाऊस होत आहे. मंगळवारी (ता.३०) सायंकाळच्या सुमारास औंढा नागनाथ, हिंगोली शहरासह तालुक्‍यातील काही गावांत अर्धातास जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. 

जिल्‍ह्यात रविवारपासून (ता.२१) आर्द्रा नक्षत्र सुरू झाले आहे. या नक्षत्रात दोन दिवस वगळता इतर दिवसात कमी अधिक दररोज पाऊस होत आहे. मागील आठवड्यात सेनगाव तालुक्‍यातील गोरेगाव, आजेगाव व साखरा मंडळात अतिवृष्टी झाली. 

पर्यायी पूल वाहून गेल्याच्या घटना

यामुळे शेतकऱ्यांनी  पेरणी केलेली पिके खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच ओढ्यावरील पर्यायी पूल देखील वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्‍याची तातडीने दुरुस्‍ती देखील करण्यात आली. दरम्‍यान, मंगळवारी जिल्‍ह्यात काही भागात ढगाळ वातावरण होते. 

हिंगोली तालुक्यात पाऊस

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंगोली शहरासह तालुक्यातील अंधारवाडी, बळसोंड, कारवाडी, खांबाळा, सवड, नरसी, बोराळा, सिरसम बुद्रुक, बासंबा, फाळेगाव आदी गावात रात्री साडेसातच्या सुमारास काही वेळ जोरदार पाऊस बरसला. याशिवाय औंढा नागनाथ तालुक्‍यातील गोळेगाव, साळणा, गोजेगाव, अनखळी, पेरजाबाद, येळी, केळी, वगरवाडी, नागेशवाडी, जवळा बाजार, असोला, आजरसोंडा, पुरजळ आदी गावांत पाऊस झाला. 

पेरणी केल्यानंतर बियाणे उगवली नाहीत

इतर ठिकाणी मात्र रात्री आठ वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते. दरम्यान, काही गावांत नियमित पाऊस पडत आहे. त्‍यामुळे उगवलेल्या पिकांना लाभ होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अनेक शेतकरी सुरवातीला पेरणी केल्यानंतर बियाणे उगवली नाहीत. त्‍यामुळे दुबार पेरणी करावी लागली. तर अनेक ठिकाणी पेरलेली पिके वाहून गेल्याने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

जिल्ह्यात ६२.७३ मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात मंगळवारी (ता. ३०) सकाळी आठवाजेपर्यंत मागील २४ तासांत एकूण ६२.७३ मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरी २१४.६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे (कंसात मिलिमीटरमध्ये): हिंगोली १२. ८६ (२०८.७३), कळमनुरी-१९.३३ (१७५.३२), सेनगांव-१९.०० (२६२.२१), वसमत ६.२९ (१५८.१६), औंढा नागनाथ ५.२५ (२६८.७५). आजपर्यंत सरासरी २१४.४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com